शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने महिलेची अकरा लाखांची फसवणुक

ठाण्यातील घटना; अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
ठाणे, – शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतो अशी बतावणी करुन एका ४१ वर्षांच्या महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे अकरा लाखांची फसवणुक केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन कासारवडवली पोलिसांनी सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

तक्रारदार महिला ही ठाण्यातील जी. बी रोड परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या इंटाग्राम अकाऊंवर अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठविली होती. त्यात शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत माहिती देताना तिला शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तिने शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. तिच्याकडून प्रतिसाद मिळताच त्याने तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करुन घेतले होते. तिचा विश्‍वास संपादन करुन त्याने तिला विविध कंपन्यांचे शेअर विकत घेण्यास प्रवृत्त केले होते. त्यासाठी तिने सुमारे अकरा लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत तिला गुंतवणुक केलेल्या शेअरवर चांगला परतावा मिळाला नाही. संबंधित व्यक्तीला कॉल केल्यानंतर त्याने तिला प्रतिसाद दिला नव्हता.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page