सोळा वर्षांच्या मुलीवर दोन मित्रांकडून लैगिंक अत्याचार
दोन्ही मित्रांना अटक तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – वडिलांशी भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर आलेल्या एका सोळा वर्षांच्या मुलीवर तिच्याच दोन मित्रांनी लैगिंक अत्याचार केला तर तिसर्या अल्पवयीन मुलाने तिचे लैगिंक अत्याचार करताना मोबाईलवरुन व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी मित्रांना मुलुंड पोलिसांनी अटक केली तर अल्पवयीन मुलाची डोंगरीतील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी ठाण्यातील रहिवाशी आहे. ८ ऑगस्टला रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली होती, याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल होताच तिघांनाही शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोळा वर्षांची पिडीत मुलगी मुलुंड परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेत आहे. शनिवारी ८ ऑगस्टला तिचे तिच्या वडिलांसोबत कोटुंबिक कारणावरुन वाद झाला होता. वडिलांशी भांडण केल्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. यावेळी ती घराजवळील पाईपलाईन सायकल ट्रकववर बसली होती. यावेळी तिच्याच परिचित तिचे आरोपी मित्र तिथे आला होता. त्यांच्याशी बोलताना तिने घडलेला प्रकार सांगून तिचा राग व्यक्त केला होता. तिचे तिच्या वडिलांशी भांडण झाले होते हे समजल्यानंतर त्याने तिला शीतपेयातून बटन, गांजा दिले होते. त्यात तिला नशा आली होती.
नशेत असताना तीनपैकी दोन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने लैगिंक अत्याचार केला होता तर तिसरा अल्पवयीन मुलाने लैगिंक अत्याचाराचे मोबाईलवरुन व्हिडीओ काढले होते. हा प्रकार नंतर पिडीत तरुणीच्या लक्षात येताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. नंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी तिने घडलेला प्रकार मुलुंड पोलिसांना सांगून तिच्या तिन्ही आरोपी मित्रांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी सामूहिक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपी तरुणांना शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली तर तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोघांनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही आरोपींचीही लवकरच मेडीकल केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.