भष्ट्र मार्गाने बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महानगरपालिकेच्या माजी वरिष्ठ निरीक्षकाच्य अडचणीत वाढ
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – परवाना नसल्याने दुकानावर कारवाईचा धमकीवजा इशारा देऊन कारवाई न करण्यासाठी दुकान मालकाकडे वीस हजाराची लाचेची मागणी करुन पंधरा हजार रुपयांची लाच घेताना कारवाई करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाचे अनुज्ञापन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शांताराम कांबळे यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसर्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. सेवेत असताना त्यांनी भष्ट्र मार्गाने लाखो सुमारे ४६ लाखांची मालमत्ता जमा केल्याचा आरोप असून त्याचे प्रमाणे २७ टक्के इतके आहे. दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे.
अविनाश कांबळे के पश्चिमच्या अनुज्ञापन विभागात वरिष्ठ पालिका निरीक्षक म्हणून काम करत होते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत त्यांनी अंधेरीतील डी. एन नगर परिसरातील एका दुकानात कारवाई केली होती. त्याच्या मालकाने दुसर्या व्यक्तील ते दुकान चालविण्यासाठी दिले होते. दुकानातील कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यात काही कागदपत्रे नव्हती. त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या ऍक्ट कलम ३१३ अन्वये परवाना नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी दुकानातील भाडेकरुला दुकानाच्या मालकाला त्यांच्या कार्यालयात भेटण्यास सांगितले होते. या भाडेकरुने मालकांना ही माहिती सांगून अविनाश कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले होते.
१० ऑक्टोंबर २०२६ रोजी तक्रारदार अविनाश कांबळे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी अविनाश कांबळे यांनी बीएमसी ऍक्ट ३१३ अन्वये परवाना नसल्याचे सांगून त्यांच्या दुकानात कारवाई होणार असल्याचे सांगितले. दुकान सुरु ठेवायचे असेल तर त्यांना वीस हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर त्यांच्या दुकानावर कारवाई करण्याची धमकीवजा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात अविनाश कांबळे यांनी त्यांच्याकडे वीस हजाराची लाचेची मागणी केली.
ही रक्कम जास्त असल्याने पंधरा हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी के-पश्चिम कार्यालयाजवळ सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे १६ ऑक्टोंबरला तक्रारदार पंधरा हजाराचा पहिला हप्ता घेऊन त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी कार्यालयातील शिपाई प्रदीप खंडागळे यांनी सायबर कॅफेतील खाजगी व्यक्ती राजू देठे याला पंधरा हजार रुपये देण्यास सांगितले. त्यांनतर तक्रारदारांनी राजू देठे याला पंधरा हजार रुपये दिले होते. यावेळी या अधिकार्यांनी त्याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या चौकशीत त्याने ही लाच अविनाश कांबळे आणि प्रदीप खंडागळे यांच्या सांगण्यावरुन घेतल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनाही लाचेच्या गुन्ह्यांत या अधिकार्यांनी अटक केली.
या कारवाईनंतर अविनाश कांबळे यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. त्यात पोलिसांना काही दस्तावेज सापडले होते. त्यावरुन त्यांनी भष्ट्र मार्गाने लाखो रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे उघडकीस आले होते. १७ जुलै १९९६ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत त्यांनी ४५ लाख ८१ हजार ४६० रुपयांची संपत्ती घेतली होती. ही संपत्ती त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा २७.६५ टक्के इतकी जास्त होती. त्यामुळे त्याची चौकशी सुरु होती. ही चौकशी पूर्ण होताच शुक्रवारी २७ ऑक्टोंबर २०२६ रोजी त्यांच्याविरुद्ध ज्ञात उत्पनापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसरा गुन्हा दाखल केला आहे. दोन वर्षांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने अविनाश कांबळे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.