अनैतिक संबंधाला अडसर असलेल्या प्रेयसीच्या पतीची हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकराला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२६
कल्याण, – अनैतिक संबंधाला अडसर असलेल्या वामन आलो निरगुडा नावाच्या एका ५२ वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच परिचित मारेकर्याने कुर्हाडीने मानेवार वार करुन हत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच धनेश देड मेंगाळ याला किन्हवली पोलिसांनी अटक केली. मयताच्या पत्नीचे आरोपी धनेशसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाला वामन अडसर असल्याने त्याने त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती समाजसेविका म्हणून परिसरात परिचित आहे तर तिचा पती वामन हा शेतकरी आहे. १६ जुलैला पहाटे चार ते सकाळी साडेसहाच्या दरम्यान वामन यांची शहापूरच्या खरपत नंबर क्रमांक एकजवळ अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. वामन हे शेतात काम करण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाले होते, मात्र सायंकाळपर्यंत ते घरी आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नीने तिचे नातेवाईक आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वामन यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वामन यांचा मृतदेह एका दरीत पोलिसांना सापडला होता. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन किन्हवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार रारठोड, अप्पर पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांच्या मार्गादर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, दिपेश किणी, सहाय्यक फौजदार प्रकाश साईल, पोलीस हवालदार संतोष सुर्वे, हनुमान गायकर, सुहास सोनावणे, योगेश शेळकंदे, संदीप तांडेल (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा), किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यशवंतराव, पोलीस हवालदार जी. एम पवार, पोली शिपाई सचिन घोरगे, जगदीश देसले, जयवंत बांगर, सतीश शेलवले, बाळासाहेब कांबळे, महिला पोलीस शिपाई स्मिता फर्डे, निलम सातपुते, सपना पवार, अधिवेशन कक्ष विभागचे पोलीस हवालदार रविंद्र मोरे, दिपक गायकवाड,यांनी तपास सुरु केला होता.
घटनास्थळ दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याने मारेकर्यांनी हत्येचा कुठलाही पुरावा मागे सोडला नव्हता. तरीही तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी गावातील प्रत्येक संशयिताची चौकशी सुरु केली होती. त्यात धनेश मेंगाळ याचा समावेश होता. त्याच्या चौकशीत त्याचे आणि वामनच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. या संबंधाला वामन हा मोठा अडसर होता. त्यातून त्याने वामनच्या हत्येची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे त्याने शेतात गेलेल्य वामनची कुर्हाडीने मानेवार वार करुन हत्या केली होती.
या हत्येनंतर त्याचा मृतदेह दरीत टाकून तो पळून गेला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला हत्येच्य गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.