रेल्वे हद्दीत गुन्हे करणार्या रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगारास अटक
४० गुन्ह्यांची नोंद; कारसह विविध बँकेचे ४८ एटीएम कार्ड हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२६
वसई, – रेल्वेत हद्दीत गुन्हे करणार्या एका रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगाराला गजाआड करण्यात वसई रेल्वे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले. रोहितकुमार मुदलूकुमार पांडे असे या आरोपीचे नाव असून तो नालासोपाराचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह उत्तरप्रदेश आणि गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात ४० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक कारसह विविध बँकेचे ४८ हून अधिक एटीएम कार्ड हस्तगत केले आहे. घातक शस्त्रे बाळगणे, हत्येचा प्रयत्नासह कार्डची अदलाबदल करुन त्याने आतापर्यंत अनेक खातेदारांच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी वसई रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
१२ मार्च २०२६ रोजी यातील तक्रादार त्यांच्या मित्रांसोबत बंगलोर-जोधपूर एक्सप्रेसने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्याकडे एक तरुण आला आणि त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. काही वेळानंतर त्याने त्यांच्याकडील दिड लाखांची कॅश असलेली बॅग चोरी करुन पलायन केले होते. घडलेला प्रकार तक्रारदारांनी वसई पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. रेल्वे प्रवासादरम्यान रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार झाल्याच्या या घटनेची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत वसई रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहायक पोली आयुक्त सोपान काकड, मनिषा रावखंडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणपत सुळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद जहागिरदार, सहाय्यक फौजदार मिनाक्षी गोहिल, विवेक जवळी, पोलीस हवालदार सुदर्शन देशमुख, मिनिंद भोजने, राकेश भामरे, सतीश फडके, सतीश धायगुडे, शोएब शेख, अविनाश दिघे, कुणाल तावडे, सागर हिंगे, सचिन खंडगळे, अजीम इनामदार, सुनिल मागाडे, पोलीस अंमलदार रुपेश पाटील, सिद्धार्थ कांबळे, कुणाल ाल्डे, स्वप्नील नागरे, राजेंद्र कुल, वसई पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, पोलीस हवालदार सत्यवान सकपाळ, पाटील, डवळे, व्हातुळे, माने, नागटिळक, जाधव, अंमलदार उमंग मेहेर, ठाकूर, संकपाळ, गवई, कुटे, चव्हाण, मराठे आणि तांत्रिक शाखेचे अमोल अहिनवे यांनी तपास सुरु केला होता.
रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्हयांत रोहितकुमार पांडे याचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र राहितकुमार हा मोबाईलद्वारे कोणाच्या संपर्कात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला पकडणसाठी पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. तरीही पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन रोहितकुमारला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात रोहितकुमार हा रेल्वेत गुन्हे करणारा आंतरराज्य गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगणे, हत्येचा प्रयत्न, एटीएमची हातचलाखी करुन खातेदारांची फसवणुक करणे आदी उत्तरप्रदेश, विरार, मणिकपूर, तुळींज पोलीस ठाण्यात तीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले ाहे.
त्याच्याकडून पोलिसांनी एक तीन लाखांची कार, ४८ विविध बँकेचे एटीएम कार्ड हस्तगत केले आहेत. चौकशीत त्याने वेगवेगळ्या प्रवाशांचे एटीएम कार्डची अदलाबदल करुन खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्याची कबुली दिली. याच संदर्भात त्याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण, उत्तरप्रदेशच्या बोरिवली, पनवेल, कणकणवली, सावर्डे, विरार, डुंगरा, चिखली, पलसाना, लाईन बाजार पोलीस ठाण्यात दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. रोहितकुमारला पुढील कारवाईसाठी वसई रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याची रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.