व्यवसाय वाढीसाठी घेतलेल्या सव्वापाच कोटीची फसवणुक
अनिवासी भारतीयाला गंडा घालणार्या पिता-पूत्रीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जुलै २०२६
मुंबई, – व्यवयसाय वाढीसाठी घेतलेल्या सुमारे सव्वापाच कोटीचा अपहार करुन एका अनिवासी भारतीयाची त्याच्याच मित्रासह मुलीने फसवणुक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अविनाश चंद्रकांत विरकर केतकी अविनाश विरकर या आरोपी पिता-पूत्रीविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी अपहारासह फसवणुकीा गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायात गुंतवणूक केल्यास ५० टक्के परतावा तसेच पार्टनरशीप ऑफर करुन ही फसवणुक करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार अनिवासी भारतीय असून मूळचे पुण्याचे रहिवाशी आहे. गेल्या २३ वर्षांपासून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अमेरिकेतील फलोरिडामध्ये राहत असून तिथेच त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. अविनाश विरकर हा त्यांचा कॉलेज मित्र असून ते दोघेही अभियांत्रिकी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. चार वर्षांपूर्वी त्याने त्यांना कॉल करुन त्याने स्वतचा जुनी बांधकाम यंत्रसामुग्री खरेदी, दुरुस्ती आणि विक्रीचा वयवसाय सुरु केल्याचे सांगितले होते. त्याला विविध नामांकित कंपन्यांकडून मोठी कॉन्ट्रक्ट मिळत असून व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत हवी आहे. त्याने त्याच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्याला ५० टक्के पार्टनरशीप ऑफर केली होती. अविनाश हा त्याचा कॉलेजपासूनचा मित्र असल्याने त्यांनी त्याला व्यवसायात मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला ऑक्टोंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत भारतासह अमेरिकेतील विविध बँक खात्यातून सुमारे सव्वापाच कोटी ट्रान्स्फर केले होते. या कालावधीत तो त्याच्या संपर्कात राहून त्याचा व्यवसाय चांगला सुरु असून त्याला मूळ रक्कमेसह ५० टक्के परतावा देण्याबाबत बोलत होता. मात्र प्रत्यक्षात त्याने त्यांना मूळ रक्कमेसह परतावा दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्या बँक स्टेटमेंटची पाहणी केली होती. त्यात त्यांना अविनाशने व्यवसायासाठी घेतलेली रक्कम प्रत्यक्षात व्यवसायात न गुंतवता स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केल्याचे दिसून आले. त्याच्या व्यवसयात त्याची मुलगी केतकी विरकर संपूर्ण व्यवस्थापन पाहत असल्याचे सांगितले होते. तिनेही त्यांना व्यवसाय चांगला सुरु असून त्यांची गुंतवणुक रक्कम सुरक्षित आहे. त्यांना मूळ रक्कमेसह परतावा रक्कम लवकर देणयचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नव्हते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी पिता-पूत्रीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.