३० कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

चांगल्या परताव्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त केले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जुलै २०२६
मुंबई, – सुमारे तीस कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रोहन भुषण शेठ असे या मुख्य आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चांगल्या परताव्याच्या आमिषाने रोहनसह इतर आरोपींनी अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक प्रवृत्त करुन त्यांची ३० कोटी २६ लाख ५ हजार ४७८ रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर त्याला गुजरातच्या सुरत शहरातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १.६५ कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एप्रिल २०२६ रोजी आर्थिक गुन्हे शाखेत इन्वेस्टॉक ऍपच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन अनेकांना चांगला परताव्याच्या आमिषाने गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांतील आरोपींनी तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबियांना तसेच इतर गुंतवणुकदारांना शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास दोन ते अडीच टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी पॉन्झी स्किमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. जवळपास तीन कोटी रुपयांची गुंतवणुक झाल्यानंतर आरोपी मूळ रक्कमेसह परताव्याची कुठलीही रक्कम न देता पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस येताच संबंधितांना स्थानिक पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच त्याचा तपास युनिट पाचच्या अधिकार्‍यांनी सुरु केला होता. तपासात या गुन्ह्यांत रोहन शेठ या आरोपीचा सहभाग उघडकीस आला आहे. या गुन्ह्यांतील तोच मुख्य आरोपी होता. मात्र गुन्हा दाखल होताच रोहन हा पळून गेला होता. तो विविध ठिकाणी स्वतचे नाव बदलून वास्तव्यास होता, त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असताना तो गुजरातच्या सुरत शहरात लपला असलची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत धुमाळ, उमेश शिंदे, सहाय्यक फौजदार खाते, देशपांडे, पोलीस हवालदार ठाकूर आदींचे एक पथक सुरत येथे पाठविण्यात आले होते.

या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या रोहन शेठ याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील १ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत आणल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहन शेठच्या चांगल्या परताव्याच्या आमिषाला बळी पडून त्याच्या पॉन्झी स्किममध्ये इतर कोणी गुंतवणुक करुन त्यांची फसवणुक झाली असल्यास त्यांनी गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page