आर्थिक वादात मध्यस्थी करणार्या मित्राची चाकूने भोसकून हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
ठाणे , – सहा महिन्यांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून मित्रावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नात दुसर्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला म्हणून विशाल पाटेकर या तरुणाची त्याच्याच मित्राने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना ठाणे रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या विजय सुभाषचंद्र उपाध्याय या आरोपी मित्राला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनमोल अशोक ताकतोडे हा ठाण्यातील कैसर मिल सर्कल गोकुळनगरचा रहिवाशी असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्यांचा मार्श हा त्याच्या उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गावी जाणार होता. त्यामुळे त्याला सोडण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकात जाणार होते. यावेळी अनमोल हा त्याचे दोन मित्र विशाल पाटेकर आणि मयुरेश जाधव यांच्यासोबत ठाणे रेल्वे स्थानकात आला होता. मार्शला सोडून ते घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांना त्यांचा मित्र विजय उपाध्याय हा भेटला होता. रेल्वे स्थानकाबाहेर चने घेऊन ते चौघेही चालत क्रिक ब्रिजवरुन जात होते. याच दरम्यान पैशांच्या वादातून विजयने अनमोलची कॉलर पकडून त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र प्रसंगावधान दाखवून त्याने त्याला जोरात धक्का बसला होता. त्यात तोंडाला चाकू लागल्याने त्याला दुखापत झाली होती. जीव वाचविण्यासाठी अनमोल हा सुसाट वेगाने पळू लागला. मागे वळून पाहिल्यानंतर त्याचा विजय हा पाठलाग करत असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. नंतर त्याने मागे वळून न बघता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही अंतर गेल्यानंतर तो छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन त्याने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. याच दरम्यान तिथे आलेल्या पोलिसांनी अनमोलची चौकशी केली होती. यावेळी त्याने त्याच्या मित्राने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले. त्यांच्यात भांडणात विशाल पाटेकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता,
अनमोल पळून गेल्याने विशालने विशालवर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्याला स्थानिक लोकांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच ठाणे रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अनमोल ताकतोडे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विजय उपाध्यायविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या विजय उपाध्यायला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात अनमोल आणि विजय यांच्यात सहा महिन्यांपूर्वी पैशांवरुन वाद झाला होता. त्याचा विजयच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने अनमोलची हत्या करण्यासाठी चाकू आणून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यात भांडणात विशाल याने मध्यस्थी केली होती. त्याचा राग आल्याने त्याने अनमोल पळून गेल्यानंतर विशालची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला, मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी काही तासांत अटक केली.