३५ वर्षांच्या सूनेच्या हत्येप्रकरणी ६० वर्षांच्या वयोवृद्ध सासूला अटक
कौटु्रंबिक हिसांचाराची तक्रार केली म्हणून हत्या केल्याचा संशय
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – घाटकोपर येथे राहणार्या सपना प्रमोद गंजी या ३५ वर्षांच्या सूनेची वयोवृद्ध सासूने हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच धनलक्ष्मी भिक्षापती गंजी या ६० वर्षांच्या आरोपी सासूला पंतनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली म्हणून सासूने ही हत्या केल्याचा संशय आहे.
ही घटना रविवारी १६ ऑगस्टला सायंकाळी सात वाजता घाटकोपर येथील लक्ष्मीनगर, त्रिवेणी अपार्टमेंटच्या डी विंगच्या रुम क्रमांक २०४ मध्ये घडली. ६३ वर्षांचे राजेंद्र नरसय्या वल्लाल हे टेलरकाम करत असून नालासोपारा येथे राहतात. त्यांना नरेंद्र नावाचा एक मुलगा असून तो सध्या कॅनडामधील एका हॉटेलमध्ये तर सून राजश्री ही दुबई येथे कामाला आहे. सपना ही मुलगी विवाहीत असून ती घाटकोपर येथे राहते. २०१३ साली तिचे प्रमोद गंजीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर दोन वर्ष सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र नंतर तिचा पती प्रमोद, सासरा भिक्षापती, सासू धनलक्ष्मी आणि दिर किरण आणि गणेश गंजी हे तिला मानसिक शोषण करत होते.
क्षुल्लक कारणावरुन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती, सतत टोमणे मारले जात होते. त्यांच्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी सपनाने तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात कौटु्रंबिक हिंसाचारासह विनयभंग, अनैसगिंक लैगिंक अत्याचार, शिवीगाळ करुन मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. या खटल्याची सुनावणी कोर्टात सुरु होती. ऑगस्ट २०२४ रोजी प्रमोदसह इतर आरोपींनी घडलेल्या प्रकाराची माफी मागून सपनासोबत नव्याने संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला होता.
भविष्यात तिला कुठलाही त्रास होणार नाही असे आश्वासन दिले होते. त्यामुळे सपना ही तिच्या पतीसोबत विक्रोळी येथे स्वतंत्र घर घेऊन राहू लागली होती. एक वर्षांनी ते दोघेही पुन्हा त्यांच्या घाटकोपर येथील घरी आले होते. सोमवारी रात्री साडेबारा वाजता भिक्षापती गंजी यांनी सपना ही बाथरुममध्ये पडली असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे राजेंद्र वल्लाल यांना फोनवरुन माहिती दिली होती. त्यामुळे ते सर्वजण राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना सपनाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले.
मृतदेहाची पाहिल्यानंतर तिच्या डोक्यात मोठी जखम होती. तिच्या चेहर्यावर, मानेवर, खांद्यावर मारहाणीचे व्रण होते. सपनाचा मृत्यू नैसगिक नसून तिची तिच्याच सासूने हत्या केल्याचा राजेंद्र वल्लाल यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी पंतनगर पोलिसांत सासू धनलक्ष्मीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुंन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. सपनाने गंजी कुटुंबियाविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर गंजी कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास सोसावा लागला होता. त्यातून धनलक्ष्मीने सपनाच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन हता केली असावी असा संशय राजेंद्र वल्लाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. धनलक्ष्मी ही सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत गंजी कुटुंबातील इतर कुठल्या सदस्यांचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.