कुरार पोलीस ठाण्यासह शहरात घातपात घडविण्याच्या धमकीने खळबळ
दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – कुरार पोलीस ठाण्यात मुंबईत शहरात आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध स्थानिक पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आला आहे. धमकी देणार्या व्यक्तींचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे.
मंगळवारी दुपारी बारा वाजता मुंबइ्र पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्रणावती फाटक नावाच्या एका व्यक्तीने मोबाईलवरुन कॉल केला होता. त्याने धीरज ऊर्फ वनराज नावाचा एक व्यक्ती कुरार पोलीस ठाणे उडवून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर त्याने कॉल बंद केला होता. या धमकीनंतर ही माहिती कुरार पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर संपूर्ण पोलीस ठाण्याची तपासणी करण्यात आली होती. मात्र कुठेही पोलिसांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे.
ही घटना ताजी असताना मुंबई पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात घातपात होणार आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांकडून हा सल्ला होणार असून मुंबई पोलिसांनी सावधगिरी बाळगावी असे नमूद केले होते. हा मॅसेज नंतर मुंबई वेब डेव्हल्पमेंट सेंटरच्या अधिकार्यांना वरिष्ठांच्या ग्रुपवर पाठविला होता.
या धमकीनंतर मुंबई शहरातील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना सतर्क राहून जास्तीत जास्त नाकाबंदी आणि कोम्बिंब ऑपरेशनवर भर देण्याचे आदेश दिले आहे. या दरम्यान प्रत्येक संशयित व्यक्तींची पोलिसांकडून कसून चौकशी करावी, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात यावे अशा सूचना वरिष्ठांकडून करण्यात आल्या आहेत.