६५ कोटीच्या मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी दिनो मोरियाची चौकशी
सहा तासाच्या चौकशीनंतर पुन्हा हजर राहण्याचे समन्स बजाविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सुमारे ६५ कोटीच्या मिठी नदी गाळ काढण्यात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी सिनेअभिनेता दिनो मोरिया याची शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी चौकशी केली. त्याची जबानी नांेंदविण्यात आला असून या जबानीनंतर त्याला सहा तासांनी सोडून देणयात आहे. गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. दरम्यान गेल्या वर्षी मे महिन्यांत दिनोसह त्याच्या भावाची दोन वेळा चौकशी करण्यात आली होती, या चौकशीनंतर या दोघांना सोडून देण्यात आले आहे.
मिठी नदीवरील गाळा काढण्यासाठी बोगस करार करुन महानगरपालिकेची सुमारे ६५ कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित तेरा आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून मनपाच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत मध्यस्थीची भूमिका पार पाडणार्या केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना या दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने जामिन मंजूर केला होता.
केतन कदम हा बोवड इंडिया एलएलपीचा संचालक होता. त्याच्या कंपनीला मिठी नदीचा गाळ काढण्याची कंत्राट देण्यात आले होते. केतनच्या चौकशीदरम्यान दिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया यांच्यात अनेकदा संभाषण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही बंधूंना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मे २०२५ रोजी या दोघाचंी दोन वेळा आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. त्यांची जबानी नोंदविण्यात आली होती.
या जबानीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी २ ऑक्टोंबरला दिनो मोरियाला पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यामुळे तो पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाला होता. जवळपास आठ तास चौकशी केल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता त्याला सोडून देण्यात आले होते. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे.