सायन हॉस्पिटलच्या वसतिगृहात शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या

चौकशीनंतर आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सायन हॉस्पिटलच्या वसातिगृहात एका २६ वर्षांच्या शिकाऊ डाक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवचरण आप्पा पाटील असे असे या डॉक्टरचे नाव असून त्याने भुलीचे इंजेक्शन घेऊन स्वतचे जीवन संपविले. या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे शिवचरण यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक आणि सहकारी डॉक्टरांच्या चौकशीनंतर या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

शिवचरण पाटील हा सायन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षांत शिकत होता. मुंबईत राहणयची व्यवस्था नसल्याने तो हॉस्पिटलच्या वसतिगृहात राहत होता. त्याच्यासोबत त्याचे काही सहकारी डॉक्टर एकत्र राहत होते. शनिवारी तो हॉस्पिटलसह वॉर्डमध्ये आला नाही. त्यामुळे त्याच्या रुम पार्टनरने त्याचा वसतिगृहातील रुममध्ये शोध घेतला, मात्र तिथे त्याला तो सापडला नाही. त्यामुळे त्याने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाथरुममध्ये त्याचा मोबाईल वाजत होता. त्याने बाथरुमचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून शिवचरणने प्रतिसाद दिला नाही.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती तेथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यासह सुरक्षारक्षकांना दिली होती. या माहितीनंतर सुरक्षारक्षकांनी बाथरुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, यावेळी तिथे शिवचरण बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिवचरणच्या हाताला आयबी सलाईन लावलेली होती. कमोडमध्ये दोन भूल देण्याच्या औषधांच्या बाटल्या आढळून आले. त्याने भूल देण्याचे इंजेक्शन घेऊन जीवन संपविले होते. शिवचरणने आत्महत्या केल्याचे उघडकीस येताच ही माहिती नंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून सायन पोलिसांना देण्यात आली.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. शिवचरणचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या मोबाईलची तपासणी सुरु आहे. त्याच्या आत्महत्येची माहिती नंतर त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्याच्यासह त्याच्या सहकारी मित्रांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

या चौकशीतून त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपविण्यात आला. शिवचरणच्या आत्महत्येने सायन हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. याप्रकरणी सायन पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page