सेक्स रॅकेटप्रकरणी वेश्यादलाल महिलेस अटक तर दोन महिलांची सुटका

विविध हॉटेलमध्ये तरुणीसह महिला सप्लाय करत असल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – ग्राहकांच्या मागणीनुसार अंधेरी, साकिनाका आणि घाटकोपर येथील विविध हॉटेल, गेस्ट हाऊस तसेच लॉजमध्ये तरुणीसह महिला पुरविणार्‍या एका वेश्यादलाल महिलेस घाटकोपर पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिच्या तावडीतून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. आरोपी महिला ऑनलाईन सेक्स रॅकैट चालवून मोबाईलवर सर्व आर्थिक व्ववहार करुन तिच्या परिचित तरुणीसह महिलांना ग्राहकांसोबत हॉटेलमध्ये पाठवत असल्याचा आरोप आहे.

स्वाती नावाची महिला अंधेरीतील सहार कार्गो परिसरात राहत असून ती ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवते. तिच्या संपर्कात असलेल्या तरुणीसह काही महिलांना ती शारीरिक संबंधासाठी ग्राहकासोबत पाठवते. अंधेरी, घाटकोपर आणि साकिनाका परिसरात ग्राहकांना हॉटेल बुक करण्यास सांगून तिथे या तरुणीसह महिलांना पाठविले जात होते. गुरुवारी ती घाटकोपर येथील एका हॉटैलमध्ये दोन तरुणींना घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वैभव गाडे यांना मिळाली होती. त्यांच्या एका बोगस ग्राहकाने स्वातीला संपर्क साधून घाटकोपर येथे बोलाविले होते. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित माहितीची शहानिशा करुन कारवाईचे आदेश दिले होते.

या बोगस ग्राहकाला स्वातीला संपर्क साधून दोन तरुणींची मागणी केली होती. त्यानंतर तिने त्याला व्हॉटअपवर दोन ते तीन महिलांचे फोटो पाठविले होते. त्यापैकी दोघींची निवड करुन ग्राहकाने तिला हॉटेलमध्ये येण्यास सांगितले होते. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक शाह, सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार, पोलीस उपनिरीक्षक वैभव गाडे, पोलीस हवालदार योगेश पाटील, पोलीस शिपाई चव्हाण, नाळे, महिला हवालदार रेखा यादव, महिला पोलीस शिपाई सिमा राठोड आदी पथकाने घाटकोपरच्या हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी दुपारी स्वाती ही दोन महिलांसोबत हॉटेलमध्ये आली होती. तिथेच तिची बोगस ग्राहकाशी ओळख झाली होती.

हॉटेलच्या एका रुममध्ये त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असताना ग्राहकाने पोलिसांना इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर या पोलीस पथकाने तिथे कारवाई केली होती. स्वातीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली. या दोन्ही महिलांची चौकशी केल्यानंतर त्या दोघीही काही महिन्यांपासून स्वातीच्या संपर्कात होत्या. ती विविध ग्राहकांसोबत त्यांना वेश्याव्ववसायासाठी पाठवत होती. ग्राहकाकडून मिळालेली काही रक्कम त्यांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम ती स्वतकडे ठेवत होती.

या महिलांच्या गरीबीचा फायदा घेऊन तसेच झटपट श्रीमंतीचे स्वप्न दाखवून तिने त्यांना व्यवसायात आणले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर स्वातीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. सुटका केलेल्या दोन्ही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर या दोघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page