लगट करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर सतरा वर्षांच्या मुलीची हत्या

मुलांचा सांभाळ करण्यासाठी बोलाविलेल्या आरोपी मित्राला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तिच्याच परिचित आरोपीने मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच रामसिंग बनवारीलाल यादव या ३६ वर्षांच्या आरोपी मित्राला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. रामसिंग हा मृत मुलीच्या वडिलांचा जवळचा मित्र असून पत्नी आणि मुलगा गावी जात असल्योन त्याने त्याला मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरी बोलाविले होते. त्यानेच घरात कोणीही नसताना मुलीशी जवळीक साधून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, तिने विरोध केल्यानंतर त्याचे पितळ उघडे पडेल या भीतीने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमीत ताड यांनी दुजोरा दिला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी रामसिंग पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

३८ वर्षांचे तक्रारदार मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून सध्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते त्यांची पत्नी, दोन मुले आणि एक मुलीसोबत कुर्ला येथे राहत होते. दोन वर्षापूर्वी त्यांचे कुटुंबिय त्यांच्या उत्तरप्रदेशातील गावी राहत होते. नंतर ते सर्वजण कुर्ला येथे राहण्यासाठी आले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची बिगारी काम करणार्‍या रामसिंगशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर रामसिंग हा नियमित त्यांच्या घरी येत होता. मे २०२६ ते त्यांच्या गावी गावी गेले होते, यावेळी रामसिंग दहा दिवस त्यांच्याच घरी राहत होता. गेल्या दिड महिन्यांपासून त्यांच्या मुलाला कावीळ झाले होते.

उपचार करुनही त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी मुलाला घेऊन गावी जाणार होती. त्यामुळे त्यांनी रामसिंगला मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या घरी राहण्यासाठी बोलाविले होते. शुक्रवारी ९ ऑक्टोंबरला तो चंदीगढच्या अंबाला येथून त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याच्या पत्नीने परिसरातील सलूनचालकाला ती गावी जाणार आहे, रामसिंग हा तिच्या मुलांचा सांभाळ करणार आहे. त्यांनीही मुलांकडे लक्ष ठेवावे अशी विनंती केली होती. ठरल्याप्रमाणे रात्री साडेअकरा वाजता तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि मुलासेाबत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात त्यांना गावी सोडण्यसाठी गेले होते, यावेळी त्यांच्या घरी रामसिंग, त्यांची मुलगी आणि मुलगा असे तिघेच होते.

रात्री दिड वाजता त्यांनी रामसिंगला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्याने ते तिघेही झोपण्याची तयारी करत असल्याचे सांगितले. सकाळी सहाची ट्रेन असल्याने तक्रारदार पत्नी अणि मुलासोबत रेल्वे स्थानकात थांबले होते. पहाटे साडेचार वाजता रामसिंगने त्यांना कॉल करुन त्यांची मुलगी बेशुद्धावस्थेत पडली आहे असे सांगितले. त्यामुळे तिने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी तिला तिची मुलगी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. तिने तिला घरी आणून तोंडावर पाणी मारा, तोपर्यंत आम्ही घरी येतो असे सांगितले. काही वेळानंतर ते सर्वजण घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी बेशुद्धास्थेत असल्याचे दिसून आली.

तिच्या गळ्यावर आडवी लालसर आणि हनुवटीला उजव्या बाजूला जखम दिसत होती. त्यामुळे त्यांनी तिला तातडीने कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर प्राप्त झाला. त्यात तिची गळा आवळून तसेच डोक्याला कोणत्या तरी हत्याराने मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. गुन्ह्यांच्या वेळेस रामसिंग हा त्यांच्या दोन मुलांसोबत घरी होता. त्यामुळे रामसिंगनेच त्यांच्या मुलीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करुन त्याच्याविरुद्ध विनोबा भावे नगर पेालिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी रामसिंगविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमीत ताड यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या पोलीस पथकाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने रामसिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत घरी कोणीही नसल्याची संधी साधून रामसिंगने सतरा वर्षांच्या मुलीशी जवळीक साधून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याला विरोध केला होात.

हा प्रकार तिच्याकडून तिच्या पालकांना समजेल आणि आपले पितळ उघड होईल या भीतीने त्याने तिची घरातील लाटण्याने गळा आवळून आणि नंतर डोक्यावर जोरात प्रहार करुन हत्या केली होती. त्यानंतर त्याने ती बेशुद्ध पडल्याचा बनाव केला होता. मात्र त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमीत ताड यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page