पोलीस असल्याची बतावणी रॉबरी करणार्‍या तिघांवर मोक्का

तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन, प्रसंगी घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरी करणार्‍या तिघांवर खार पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. संजय दशरथ म्हात्रे, शक्तीकुमार रामशिश सिंह आणि इम्रान अहमद शेख ऊर्फ जितेंद्र ऊर्फ जिग्नेश अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर तिघांनाही मोक्का कोर्टात हहजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार शुभणकर नारायण सालियन हे कांदिवली परिसरात राहतात. त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत हवी होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान लोकलमध्ये प्रवास करताना त्यांची इम्रान शेखशी ओळख झाली होती. त्याने त्यांना पाच लाखांच्या मोबदल्यात त्यांना दहा लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. पाच लाखांवर दहा लाख रुपये मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. ठरल्याप्रमाणे इम्रानने त्यांना पाच लाख रुपये घेऊन खार परिसरात बोलाविले होते. २० जून २०२६ रोजी शुभणकर सालियन हे पाच लाख रुपये घेऊन खार येथील रोड क्रमांक अकरा, वृंदावन हॉटेलजवळ आले होते. यावेळी तिथे इम्रान आला नाही, मात्र त्याने इतर दोन व्यक्तींना तिथे पाठविले होते.

काही वेळानंतर या आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करुन, चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख रुपये कॅश असलेली बॅग घेऊन तेथून पलायन केले होते. घडलेल्या प्रकारामुळे शुभणकर सालियन यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करुन, घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून संजय म्हात्रे, शक्तीकुमार सिंह आणि इम्रान शेख या तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली होती. तपासात अशा प्रकारे रॉबरी करणारी ही रेकॉर्डवरील सराईत टोळी आहे. त्यांनी संघटितरीत्या अशा प्रकारे गुन्हे केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली होती. त्यास अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली होती. या मंजुरीनंतर या तिघांविरुद्ध आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टकेनंतर त्यांना मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास वांद्रे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

इस्त्राईल खानवरही मोक्कातर्ंगत कारवाई
साकिनाका परिसरात प्रचंड दशहत असलेला सराईत गुन्हेगार इस्त्राईल इस्माईल खान याच्यावर साकिनाका पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. इस्त्राईल हा संघटित गुन्हेगारी टोळी चालवत होता. त्याच्यासह त्याचे सहकारी परिसरात दहशत निर्माण करुन घातक शस्त्रांचा धाक दाखवून गंभीर गुन्हे करत होते. अलीकडेच या टोळीने एका कार्यालयात घुसून घातक शस्त्रांचा धाक दाखून कार्यालयातील ४५ हजाराची कॅश घेतली, त्यानंतर तक्रारदारांना फोन पेवरुन ७५ हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या इस्त्राईलला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केलीद आहे. त्याच्याविरुद्ध घाटकोपर, साकिनाका पोलीस ठाण्यात अठराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. २०१३ आणि २०१६ साली त्याच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी १०७ आणि ११० कलमांतर्गत कारवाई केली होती. २०१७ साली त्याला घाटकोपर पोलिसांनी तर २०२४ साली साकिनाका पोलिसांनी एक वर्षांसाठी तडीपार केले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक् अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर मेंढे, नेत्रा मुळे, पोलीस उपनिरीक्षक खलील शेख, पोलीस हवालदार अर्चना रेडेकर, पोलीस शिपाई अरुण बोडके, बालाजी भुरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page